Thursday, October 22, 2015

खूप दिवसांनी काहीतरी सुचलं आणि लिहावसं वाटलं…

दररोज हा पक्ष्यांचा थवा
खिडकीच्या कोपऱ्यातून डोकावणारा
जसा काही मलाच म्हणतोय…
"अगं  बघ जरा, आकाशाकडे बघ;
आपले आकाश इतके खुजे नको करुस
मार भरारी एकदातरी मुक्तपणे, कवेत घे ते आकाश
जे खुणावतेय तुला आलिंगन द्यायला …"
खरेच तो पक्ष्यांचा थवा म्हणत असेल का हो मला …?


1 comment:

  1. Very liberating message
    Just what I needed to read
    Thanks
    http://itigargi.blogspot.com/

    ReplyDelete